खरे तर आम्ही ब्लॉग का लिहावा .. आम्ही काही कुणी सेलेब्रिटी नाही.. आम्हास आमच्या कॉलनीत सुद्धा फारसे कुणी ''पेहचानत'' नाही. पण ज्याप्रमाणे माधुरी दिक्षितसारखी अँक्टिंग येत नाही म्हणून बिपाशा बसूने अँक्टिंग करूच नये का ? त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सेलेब्रिटी नसलो तरी ब्लॉग लिहूच नये का?
ब्लॉग हा फक्त वादग्रस्त व्यक्तींनी लिहायचा असतो असा आमचा पूर्वग्रह होता. मग आम्ही निरनिराळ्या वादात अडकण्याचा प्रयत्न केला.. घरी, ऑफिसात, मित्राशी काही वाद घालून पहिले. पण ''वादग्रस्त व्यक्ती'' असं लेबल काही केल्या लागलं नाही. उलट, फालतू बडबड करू नको बे. असा प्रेमळ सल्ला मिळाला.. असो.
मध्यंतरी मराठी भाषा दिन येऊन गेला. तो जागतिक वगैरे असल्याचे इंग्रजी पेपरमधून कळले. ते निमित्त साधून आम्ही ब्लॉग मराठीतच लिहिण्याची प्रतिज्ञा केली. मराठीच्या जागतिकपणाचा गर्व आम्हास झाला. आमची छाती अभिमानाने फुलून आली. काही विद्वान उठसूठ मराठी भाषा रसातळाला जात असल्याची आवई उठवतात.. आता ही मराठी.. जागतिक भाषा... इतकी अगतिक कशी असेल ?? त्यामुळे आजचा एक दिवसतरी मराठीतच बोलावे असे आम्ही ठरवले.आणि एकदा आम्ही ठरवले कि बस .. आय बिकम अनस्टॉपेबल...!!!
सुरुवातीला वाटले, आपण लिहिलेले वाचणार कोण? वाचायला वेळ आहे कुणाकडे? मोबाईल,कॉम्प्युटर, इंटरनेटच्या जीव घाबरवून टाकणाऱ्या गर्दीत वाचनाची आवड किती लोकांकडे उरलीये??. त्यात जर काही सनसनाटी, चटपटीत काही असेल तरच लोक वाचणार.. साध्यासरळ बातम्या सुद्धा लोक ऐकत नाही आता.. बातम्यांचं नाट्य रुपांतर करावं लागतं हल्ली.. T.R.P च्या स्पर्धेत सतत भावनेला हात घालणारं, नाट्यमय, अतिरंजित पाहायला सरावलेले आपले डोळे.. त्यामुळे हे लेखन अळणी वाटण्याचीच शक्यता अधिक ... .
तरीसुद्धा, आम्ही न डगमगता, मराठीत लिहिण्याचा वज्रनिर्धार केला आहे.. दुसरा कुठलाही निर्धार आता ह्यापुढे तुच्छ आहे .. .. !! कुठल्याही संकटांची तमा न बाळगता, slow internet ला न जुमानता, load shading वर मात करून ... (आणि अर्थात नोकरी सांभाळूनच.... हो. ब्लॉग लिहून पोट थोडीच भरणार....!! ) आम्ही ही दैनंदिनी लिहिण्याचे योजिले आहे..
ही सर्व उठाठेव करताना आम्हास अत्यंत गहिवरून येत आहे.. फार पूर्वी शाळेत गणितात काठावर पास झाल्यावर आम्हास असेच गहिवरून येत असे. तो आनंद ... आणि हा आजचा..!!!
अखेरीस ,आम्ही नम्रपणे व प्रामाणिकपणे सांगू इच्छितो कि मराठीत चार ओळी लिहून साहित्य सेवा वगैरे करावी असा भव्य व उदात्त हेतू आमचा नसून, विसरत चाललेल्या मराठीत काही waves व्यक्त कराव्यात व चार लोकात मोठेपणा मिरवावा असा शुद्ध स्वार्थी हेतू मनाशी बाळगून हा ब्लॉग सुरु करत आहोत...!!

3 comments:
Khupach chhan. Congrats and nice to see u here.
whenevr i get time, i will read. Superbch ihilay. keep writing.
Nice
Post a Comment